ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 08:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन

शहर : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलंय. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बिहार डिजेपी गुप्तेश्वर पांडे यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्वीट केलंय. आयपीएस अधिकृत विनय तिवारी आज पटण्याहून मुंबईत त्यांच्या कर्तव्यावर बिहार पोलिसांचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत गेले. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजता त्यांना जबरदस्ती क्वारंटाईन केलंय. मागणी करुनही त्यांना आयपीएस मेस देण्यात आल्याचेही पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

विनय तिवारी यांना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये राहायचे आहे. यासाठी ते वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याशी बोलले होते. डीसीपी मधील आयजी हेडक्वार्टरशी त्यांच्या संपर्क करुन देण्यात आला होता. त्यांना राहण्यासाठी रुम देण्यात आली होती. पण त्यानंतर आयजी हेजक्वार्टरने त्यांचे फोन उचलले नाहीत.

 

मागे

Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात
Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर या....

अधिक वाचा

पुढे  

खुषखबर ! भारतामध्ये कोरोना लसीच्या मानवी चाचणीस मंजुरी
खुषखबर ! भारतामध्ये कोरोना लसीच्या मानवी चाचणीस मंजुरी

भारतीय औषध महानियंत्रण ( DGCI) ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने संशोधित केलेल्या कोरो....

Read more