By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 09:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या सीबीआय चौकशीवर Central Bureau of Investigation (CBI) सुशांतच्या कुटुंबानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआय तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, ते आम्हाला आता कळत नाही, अशी खंत सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी व्यक्त केली आहे.
सीबीआयने आतापर्यंत तपासाबाबच साधी पत्रकार परिषदही न घेतल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीआय तपासाच्या वेगाबाबत आम्ही समाधानी नसल्याचंही त्यांनी नमूद केले आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास Sushant Singh Rajput death case भरकटवून ड्रग्जच्या दिशेने नेण्यात आला आहे. तसेच ज्या धीम्या गतीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरही सुशांतचं कुटुंब नाराज असल्याचं विकास सिंह यांनी म्हटले आहे.
एम्सच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सुशांतचा मृत्यू गळा दाबून झाला आहे, असंही विकास सिंह यांनी म्हटले आहे. विकास सिंह यांच्या या आरोपांवर राज्य सरकारच्याच चुकीमुळे सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात उशीर होत असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे. तर मारुती कांबळेचे काय झाले, या धर्तीवर सीबीआय चौकशीचे काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा....
अधिक वाचा