By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73 व्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर कडाडून हल्ला केला होता. दहशतवादाला खतपाणी देण्याचं काम पाकिस्तानकडून केलं जात असल्याचं आरोप सुषमा स्वराज यांनी केलं होतं. सुषमा स्वराज यांनी सांगितले होते की, न्यूयॉर्कमध्ये 9/11 घटना आणि मुंबईमध्ये 26/11 ची घटना यामुळे शांतीपूर्ण चर्चा करण्याची अपेक्षा मावळली आहे. भारत दहशतवादाचा शिकार होत आहे. दहशतवादाचं आव्हान आमच्या शेजारील देशाशिवाय कुठून येत नाही. पाकिस्तान असा देश आहे की, दहशतवाद पसरविण्यासोबतच केलेलं कृत्य लपविण्यातही ते माहीर आहेत अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारले होते.
सुषमा स्वराज यांनी जलवायू परिवर्तन आणि दहशतवाद हे जगासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे असं सांगितले होते. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या विनंतीवरुन स्वराज यांनी सांगितले होते की, भारत कायम चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे मात्र नेहमी पाकिस्तानकडून दगा दिला. आम्ही नेहमी चर्चा करुन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा पाकिस्तानसोबत चर्चा होते त्यावेळी पाकिस्तानच्या ना पाक हरकतींमुळे चर्चा थांबविली जाते असं त्यांनी सांगितले होते.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.
सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
साऱ्या देशाला शोकसागरात टाकणारी एक घटना मंगळवारी घडली. माजी परराष्ट्र मंत्....
अधिक वाचा