ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पालघर नजीकच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसून आल्याने पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 12:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालघर नजीकच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसून आल्याने पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

शहर : मुंबई

पालघर नजीकच्या समुद्रात संशयास्पद बोट दिसून आल्याने पोलिसांकडून संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यानंतर काही दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे पलायन केल्याचे सांगितले जात होते. या दहशतवाद्यांना मोहम्मद मिरसा नावाच्या व्यक्तीने आपल्या बोटीत आश्रय दिला होता. ही बोट सध्या पालघर नजीकच्या समुद्रात फिरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आणि तटरक्षक दल सतर्क झाले आहे.

            

या बोटीवर मोठ्याप्रमाणात अन्न धान्य आणि अन्य वस्तूंचा साठा आहे. यामुळे तटरक्षक दलाने पालघरच्या मच्छीमारांशी शुक्रवारी सकाळीच बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. ही हालचाली दिसल्यास तटरक्षक दल किंवा पोलिसांना लागलीच कळविण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या किनारपट्टीवर आयसिस या दहशतवादी संघटनेच्या हालचाली वाढल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. केरळमध्ये १५ दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे केरळमध्ये यापूर्वीच हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

 

 

मागे

लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का
लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का

लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक झटका बसला आहे. ईडीने न....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या तिकिट दरात वाढ
पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या तिकिट दरात वाढ

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकिट दरात १ जूनपासून वाढ कर....

Read more