By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे उद्घाटन केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पुरी आणि स्वच्छ सर्वेक्षण 2020 साधने, स्वच्छ भारत अभियान, वॉटर प्लस प्रोटोकॉल आणि आणि टूलकिट स्वच्छ नगर या घनकचरा व्यवस्थापन अपचे उद्घाटन केले. यावेळी स्वच्छ संरक्षण संकल्पनेविषयी एक गीतही प्रसारित करण्यात आले आहे. या वेळी बोलताना पुरी यांनी सांगितले की, याआधी स्वच्छ सर्वेक्षण करताना देशभरातील शहरांमधील स्वच्छताविषयक उपक्रमांची मूल्यमापन केले जात होते. आता 2020 जानेवारी महिन्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. ही स्वच्छता मोहीम म्हणजे स्वच्छ कचरामुक्त आणि निरोगी नव्या भारताच्या निर्मितीसाठी आपल्याला मिळालेली एक संधी तर आहेच त्याशिवाय स्वच्छतेची सवय जनमाणसात रुजावीन्यासाठी एक आराखडा यातून मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते
उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल देशातील 96 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा....
अधिक वाचा