ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची “धनुष” तोफ दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची “धनुष” तोफ दाखल

शहर : मुंबई

जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या रेतीमधूनही शत्रूंवर थेट लक्ष्य साधणारी स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ भारतीय लष्करात दाखल झाली आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य धनुष  तोफेच्या समावेशामुळे वाढणार आहे. जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या भारतीय सीमेवर तैनात करण्यात येतील.

धनुष तोफेसाठी वापरण्यात आलेलं साहित्यातील जवळपास 90 टक्क्याहून अधिक वस्तू स्वदेशी बनावटीच्या आहेत. लष्कराकडून प्रत्येक हवामानानुसार या तोफेचे परिक्षण करण्यात आले आहे. याबाबत भारतीय लष्कर आणि सुरक्षा मंत्रालय यांनी 19 फेब्रुवारीला हिरवा कंदील दाखवला होता. 2022-23 पर्यंत भारतीय लष्कराच्या ताफ्यात 114 धनुष तोफांचा समावेश करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमात लष्कराकडे सर्वप्रथम 6 तोफा सुपूर्द करण्यात येतील . भारतीय लष्कराची पहिली स्वदेशी बोफोर्स म्हणून धनुष तोफ ओळखली जाणार आहे.

155 बाय 45 कॅलिबरची गन धनुष या तोफेमध्ये बसवण्यात आली आहे. डोंगराळ आणि रेती असणाऱ्या भागात या तोफेचा सहजरित्या वापर केला जाऊ शकतो. जवळपास 30-35 किलोमिटर पेक्षा अधिक अंतरापर्यंत ही तोफ मारा करू शकते. तर, के-9 या बंदूकीमध्ये 38 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. धनुष या तोफेचे 90 टक्के भाग भारतात बनलेले आहेत.

तोफेचा मारा सक्षमतेने अचूक व्हावा यासाठी तोफ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. या तोफेमधून विविध प्रकारचा दारुगोळा डागता येणार आहे. फिल्ड गन आणि डीआरडीओने दिलेल्या कालावधीच्या आधीच धनुष तोफ तयार करुन लष्कराच्या स्वाधीन केली आहे. या तोफेची किंमत 14.5 कोटी रुपये आहे. धनुष स्वदेशी तोफ अत्याधुनिक पद्धतीने बनविण्यात आली आहे. यामध्ये कॉम्प्युटर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे ही तोफ स्वत:चं दारूगोळा तोफेत घेऊन फायर करुन शकणार आहे. दिवसाच्या उजेडासोबत रात्रीच्या अंधारातही अचूक मारा करण्यासाठी ही तोफ सज्ज आहे. धनुष तोफ चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. धनुषच्या समावेशाने भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात दुपटीने वाढ झाली आहे.

धनुष तोफेचे वैशिष्टे

या तोफेतील बॅरेलचे वजन 2 हजार 692 इतकं आहे.

35 ते 40 किलोमीटरपेक्षा अधिक क्षमतेने मारा करु शकतो.

एका मिनिटात 2 वेळा मारा करु शकतं.

सलग 2 तास मारा करण्याची क्षमता

तोफेत लागणाऱ्या गोळ्याचे वजन 46.5 किलो.

 

मागे

भारताकडून हल्ल्याची शक्यता, पाकिस्तानच्या या वक्तव्यावर भारताचं सडेतोड उत्तर
भारताकडून हल्ल्याची शक्यता, पाकिस्तानच्या या वक्तव्यावर भारताचं सडेतोड उत्तर

भारताने रविवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या वक....

अधिक वाचा

पुढे  

भारताने पाकिस्तानला दिले कडक शब्दात उत्तर
भारताने पाकिस्तानला दिले कडक शब्दात उत्तर

भारताने रविवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या वक....

Read more