ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मिठाईवर'तयार करण्यात आलेली तारीख' आणि'एक्सपायरी डेट'दोन्हीही तारखा आवश्यक:अन्न-औषध प्रशासन मंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2020 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मिठाईवर'तयार करण्यात आलेली तारीख' आणि'एक्सपायरी डेट'दोन्हीही तारखा आवश्यक:अन्न-औषध प्रशासन मंत्री

शहर : मुंबई

दिवाळीत तयार होत असलेली मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ जे विकले जातात त्यावर ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्ही तारखा असणे बंधनकारक आहे, असे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. जनतेला सकस आणि चांगले अन्न दिवाळीच्या काळात मिळाले पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष आहे, असं मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.

सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठी मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थ्यांची विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत असतात. अशा समाजकंटकांवर देखील अन्न आणि ओषध प्रशासन लक्ष ठेवून आहे, असंही शिंगणे यांनी सांगितलं.

ग्राहकांनी देखील मिठाई घेताना तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्हीही तारखा आहेत की नाहीत, याची खात्री करुन घ्यावी. शेवटी ग्राहक म्हणून आपला तो अधिकार आहे, असंही शिंगणे म्हणाले.

संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावर कोरोना महामारीचे संकट असून अजूनही ते संकट पूर्णपणे टळलेले नाही. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सर्वधर्मियांनी सण अतिशय शांततेने आणि घरातच साजरे केले. दिवाळीसुद्धा प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

मागे

डिजीटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून स्वागत
डिजीटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून स्वागत

डिजीटल माध्यमांवर यापुढील काळात केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत....

अधिक वाचा

पुढे  

राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध!निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप
राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध!निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या निर्मितीवरुन आता नवा वाद उभा राहिला आहे. ....

Read more