By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
स्वित्झर्लंडने त्यांच्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या भारतीयांच्या संबधातल्या सूचना द्यायची प्रक्रिया वेगवान केली आहे. मागच्या एका आठवड्यामध्येच एक डझन भारतीयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. स्वित्झर्लंड प्राधिकरणाने मार्चपासून आतापर्यंत स्विस बँकांमधल्या भारतीय ग्राहकांना कमीत कमी २५ नोटीस पाठवल्या आहेत. भारत सरकारला या खात्यांची माहिती देण्याविरोधात अपील करण्याची शेवटची संधी स्वित्झर्लंडच्या प्राधिकरणाने दिली आहे.
स्वित्झर्लंड त्यांच्या बँकेत खाती असणाऱ्या ग्राहकांची नावं गोपनिय ठेवते. पण कर चोरी प्रकरणामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर करार झाल्यामुळे ही अडचण आता राहिली नाही. खातेदारांच्या नावांची माहिती देण्याबाबत स्वित्झर्लंड आणि भारत सरकारमध्ये करार झाला आहे. इतर देशांनीही अशाच प्रकारे स्वित्झर्लंडशी करार केले आहेत.
स्वित्झर्लंड सरकारने त्यांच्या देशात असलेल्या खात्यांबाबत काही माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये खातेदारांची सुरुवातीच्या नावाचं अक्षर आणि त्यांचा जन्मदिवस आणि वर्ष ही माहिती दिली आहे. फक्त २१ मे रोजी जाहीर झालेल्या यादीमध्ये ११ भारतीयांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
कोण आहेत हे भारतीय?
ज्या दोन भारतीयांची नावं पूर्ण सांगण्यात आली आहेत, त्यामध्ये मे १९४९ मध्ये जन्म झालेले कृष्ण भगवान रामचंद आणि सप्टेंबर १९७२ मध्ये जन्मलेले कल्पेश हर्षद किनारीवाला यांच्या नावाचा समावेश आहे. इतर भारतीय नावांची घोषणा करण्यात आली नसली तरी त्यांच्या नावाची अक्षरं सांगण्यात आली आहे.
२४ नोव्हेंबर १९४४ साली जन्मलेले एएसबीके, ९ जुलै १९४४ साली जन्मलेले एबीकेआय, २ नोव्हेंबर १९८३ साली जन्मलेल्या श्रीमती पीएएस, २२ नोव्हेंबर १९७३ साली जन्मलेल्या श्रीमती आरएएस, २७ नोव्हेंबर १९४४ साली जन्मलेले एपीएस, १४ ऑगस्ट १९४९ साली जन्मलेल्या श्रीमती एडीएस, २० मे १९३५ रोजी जन्मलेले एमएलए, २१ फेब्रुवारी १९६८ साली जन्मलेले एनएमए आणि २७ जून १९७३ साली जन्मलेले एमएमए ही नावं आहेत.संबंधित ग्राहक किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्र आणि पुराव्यांसह ३० दिवसांत अपीलसाठी उपस्थित राहावं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
७ मे रोजी भारतीय नागरिक रतनसिंग चौधरी यांनाही अशाचप्रकारे नोटीस देण्यात आली होती आणि १० दिवसांच्या आत अपील करायला सांगण्यात आलं होतं. याचबरोबर कुलदीप सिंग धिंगरा, अनिल भारद्वाज यांनाही अशा पद्धतीने नोटीस पाठवली होती. या नावांमधल्या काहींच्या नावांचा उल्लेक एचएसबीसी आणि पनामा पेपरच्या यादीत आहे, असं बोललं जातं, असं वृत्त नवभारत टाईम्सने दिलं आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या संस्थांमुळेच आज ७० वर्षांनंतरही भा....
अधिक वाचा