ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटेंची वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटेंची वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

शहर : मुंबई

मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये पर्स चोरीची तक्रार नोंदवली आहे. विनिता कामटे या गाडीतून उतरुन खासगी बँकेमध्ये जात असताना अज्ञात चोरटयांनी गाडीतून त्यांची पर्स चोरली. त्यामध्ये तीन हजार रुपये, दागिने आणि काही पेपर होते. तर, अशोक कामटे हे मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. विनिता कामटे यांनी मार्च महिन्यात पर्स चोरीचा एफआयआर नोंदवला आहे. पण अजूनही कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांना टक टक गँगवर संशय आहे. ही टोळी वाहनांमधून वस्तू चोरी करण्यामध्ये सक्रीय आहे. पर्सची चोरीची ही घटना घडली त्यावेळी विनिता कामटे यांचा ड्रायव्हर आणि अजून एक जण कारमध्ये होता.

आरोपींनी गाडीच्या दरवाजावर टक टक करुन ड्रायव्हरला खाली पैसे पडल्याचे सांगितले. ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर ते जबरदस्तीने गाडीत घुसले आणि पर्स उचलून त्यांनी पळ काढला असे पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

मागे

स्पेक्ट्रम पेमेंटची डेडलाइन रिलायन्सने पुन्हा चुकवली
स्पेक्ट्रम पेमेंटची डेडलाइन रिलायन्सने पुन्हा चुकवली

स्पेक्ट्रम हक्कांसाठी देय असणारी रू ४९२ कोटी रुपये भरण्याची सलग तिसरी डेडल....

अधिक वाचा

पुढे  

आता लवकरच 20 रुपयांची नोट बाजारात
आता लवकरच 20 रुपयांची नोट बाजारात

आता 10 रुपयेच्या नोटीनंतर बाजारात 20 रुपयाची नवीन नोट येणार आहे. रिझर्व्ह बँके....

Read more