By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 01:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत ३ जानेवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. अपमानजनक भाषेचा वापर करत छेडछाड केल्याची तक्रार एका महिलेने वांद्रे पोलिसात केली होती. विशेष म्हणजे नितीन सातपुते हे नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ताचे वकील आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘ही राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेरील घटना आहे. सातपुते यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप एका ४७ वर्षीय महिलेने केला. पीडितेने यानंतर खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार, मुलांसाठी बाग निर्माण करण्यावरुन सातपुतेंसोबत पीडितेचा २ नोव्हेंबरला वाद झाला होता. यानतंर सातपुतेंनी फोन करुन चुकीची भाषा वापरली. पीडितेने ४ नोव्हेंबर रोजी राज्य महिला आयोगात याबाबत तक्रार केली.’
राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसल....
अधिक वाचा