ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"तारक मेहता..." चे मेकअप आर्टिस्ट आनंद परभार यांचे निधन 

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2020 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

            मुंबई : घराघरात लोकप्रिय ठरलेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसविणार्‍या "तारक मेहता का उल्टा चष्मा" मालिकेचे मेकअप आर्टिस्ट म्हणून काम पहाणारे आनंद परमार यांचे नुकतेच निधन झाले. सुमारे १२ वर्षे ते या लोकप्रिय मालिकेशी जोडले गेले होते. कांदिवलीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे या मालिकेवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मालिकेचे चित्रीकरण तत्काळ थांबविण्यात आले होते. 

      आनंद परमार यांनी "तारक मेहता..."च्या कलाकारांना आनोखा रूपात प्रेक्षकांसमोर आणले. या मालिकेतील महत्वाच्या सदस्याचं निधन झाल्यामुळे अनेकांनी दु:ख व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून परमार यांची प्रकृती खालावली होती. कामाप्रती त्यांची असलेली ही समर्पक वृत्ती अनेकांना हेवा वाटेल अशीच होती.  
 

मागे

सोन्याची अंगठी चोरताना अभिनेत्री स्नेहलता पाटीलला अटक
सोन्याची अंगठी चोरताना अभिनेत्री स्नेहलता पाटीलला अटक

          पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात एनआयबीएम रोडवरील प्लाझा मॉलम....

अधिक वाचा

पुढे  

८ वी पास असणार्‍यांसाठी पोस्टात नोकरीची संधी 
८ वी पास असणार्‍यांसाठी पोस्टात नोकरीची संधी 

           नवी दिल्ली : ७ व्या आयोगांतर्गत पोस्टामध्ये अनेक पदांसाठी भ....

Read more