By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आपल्या विविध मागण्यासाठी शिक्षकांचे एक शिष्टमंडळ काल मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र मंत्री न भेटल्यामुळे निराश झालेल्या हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे या दोन शिक्षकांनी मंत्रालयातूनच खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु मंत्रालयाच्या इमारतीला जाळ्या बसविल्या असल्याने हे दोघे त्या जाळीवर पडले आणि वाचले त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मंत्रालयात मागण्यांसाठी अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी येतात. शिवाय काही जण वैयक्तिक कामासाठी किंवा न्याय मागण्यासाठी येतात. मात्र काही वेळा आपल्याकडे लक्षं वेधुन घेण्याचा प्रकार करतात यात कित्येक वेळा उडी मारणारा प्राणास मुकातो. अशी काही प्रकरणे घडल्यामूळेच अलीकडे मंत्रालयाच्या इमारतीला जाळ्या बसवून घेण्यात आल्या आहेत.
काल 300 विनांनुदानित दलित शाळांना अनुदान मान्य करावे, अशी मुख्य मागणी घेवून शिक्षकांचे एक शिष्टमंडळ मंत्रालयात मंत्र्याच्या भेटीसाठी आले होते. मात्र मंत्री भेटले नाहीत. त्यामुळे दोन शिक्षकांनी मंत्रालयातून उद्या टाकल्या. ते जाळीवर पडले म्हणून वाचले त्यांना वाचविण्यासाठी मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
राज्यात राज्य अन्न आयोग स्थापन करण्याबाबत राज्य शासनाकडून यापूर्वीच कार्....
अधिक वाचा