ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रयान 2 मधील दोन्ही रोव्हरचा शोध लागला, एकाने जागा बदलली, NASA चे फोटो ट्विट करत तंत्रज्ञाचा दावा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रयान 2 मधील दोन्ही रोव्हरचा शोध लागला, एकाने जागा बदलली, NASA चे फोटो ट्विट करत तंत्रज्ञाचा दावा

शहर : देश

भारतीय आंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) मिशन चंद्रयान-2 मधील रोव्हर आत्ताही चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. त्या रोव्हरने काही मीटर अंतरही पार केलं आहे, असा दावा चेन्नईच्या एका तंत्रज्ञान विशेषज्ञाने केला आहे (Chandrayaan 2 rover pragyan). या दाव्याला त्याने नासाच्या काही सॅटेलाईट फोटोंचाही आधार घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये या विशेषज्ञाने अशा अनेक फोटोंच्या सहाय्याने आपला दावा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रयान 2 मागीलवर्षी सुरु केलेलं भारताचं दुसरं आंतराळ मिशन होतं (Chandrayaan 2). चंद्रयान 2 या आंतराळ मोहिमेत विक्रम (Lander Vikram) आणि प्रज्ञान (Pragyan) लँडरही होता. मात्र, ही मोहिम अपूर्ण राहिल्यानंतर त्यांचं निश्चित स्थान समजू शकलं नव्हतं. मात्र, शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या चेन्नईच्या शनमुगा सुब्रमण्यन (Shanmuga Subramanian) या तरुण तंत्रज्ञाने ट्विटरवर नासाच्या सॅटेलाईट फोटोंच्या माध्यमातून या दोन्ही रोव्हरचा शोध लावल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यातील लँडर प्रज्ञान लँडर विक्रमपासून काही मीटर पुढे गेल्याचंही त्याने म्हटलं आहे.

सुब्रमण्यनने याआधी नासाच्या सॅटेलाईट फोटोंवरुन विक्रम लँडरचाही शोध लावला होता. मोहिम अपयशी झाल्यानंतर विक्रम लँडर बराच काळ बेपत्ता होतं. यावेळी त्याने आपला दावा पुन्हा एकदा करताना त्याविषयी सविस्तर गोष्टी मांडल्या आहेत.

चंद्रयान मोहिमेबाबतचा नेमका दावा काय?

सुब्रमण्यनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “मला माझ्या अभ्यासात चंद्रावर जे अवशेष सापडले ते विक्रम लँडरचे होते. नासाला मिळालेले अवशेष पेलोड अँटिना, रेट्रो ब्रेकिंग इंजिन, सोलर पॅनल इत्यादी असू शकते. रोव्हरचं लँडर मोडलेल्या स्थितीत आहे आणि ते जमिनीपासून काही अंतरावर आहे. रोव्हरचा शोध घेणं तसं अवघड काम होतं. कारण रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होतं. या ठिकाणी नेहमीच प्रकाश नसतो. त्यामुळे हे अवशेष 11 नोव्हेंबरला नासाला सापडले नाहीत.”

लँडरला 2 दिवस जास्त प्रमाणात अनेक आदेश देण्यात आले असावेत. त्यामुळे कदाचित हे आदेश लँडरला मिळाल्या असाव्यात आणि ते आदेश रोव्हरला मिळाले असावेत. मात्र, लँडर पृथ्वीशी संपर्क करण्या सक्षम नसावा.” वैज्ञानिकांचा लुनार सरफेसवर लँडिंगच्या 2 मिनिटे आधी विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता.

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चंद्रयान 2

चंद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रावरील स्वारी आहे. भारताने 2008 मध्ये चांद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं. 978 कोटी रुपये खर्च करुन केलेलं हे मानवविरहित मिशन (Vikram Lander Found by NASA) आहे.

7 सप्टेंबरला, ‘विक्रम लँडरज्या दिवशी चंद्रावर लँडिंग करणार होतं, तेव्हा चंद्रापासून 30 किलोमीटर ते 7.4 किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. यावेळी विक्रम लँडरचा वेग 1683 मीटर प्रतिसेकंदावरुन 146 मीटर प्रति सेकंदावर आला होता. मात्र तिथून पुढे दुसऱ्या टप्प्यात विक्रम लँडरचा वेग नियोजित वेगापेक्षा जास्त होता. त्यामुळे विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग होऊ शकल नाही. चंद्रापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग झालं होतं.

मागे

रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान
रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

रत्नीगिरीत गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येण्यासाठी पासची आवश्यकता असून विना....

अधिक वाचा

पुढे  

पुणे पालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पुणे पालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुणे महापालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्....

Read more