ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खास महिलांसाठी धावणार बेस्टची ‘तेजस्विनी’ बस

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 03:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खास महिलांसाठी धावणार बेस्टची ‘तेजस्विनी’ बस

शहर : मुंबई

बेस्टने कास महिला प्रवाशासांठी तेजस्विनी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तीन तेजस्विनी बस बेस्टच्या ताफ्यात आल्या असून त्या धारावी आगारात दाखल झाल्या आहेत. अशाप्रकारे 37 तेजस्विनी बस खरेदी केल्या जाणार असून या बस लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर धावतांना दिसणार आहेत. या बस खास करून महिलांसाठी.

मुंबईसारख्या शहरात महिला प्रवाशांची संख्याही प्रचंड वाढलीय. सध्या बेस्टच्या बसमध्ये महिलांसाठी 40 टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत. तरी देखील गर्दीच्या वेळी प्रवास अकर्टणा महिलांची खूपच अडचण होते. हे लक्षयत आणि प्रवासी संहया वाढविण्याच्या दृष्टीने ही बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारच्या साहाय्याने खास महिलांसाठी तेजस्विनी बस सेवेची घोषणा केली.

या बस खरेदी करण्यासाठी बेस्ट उपक्रमास 11 कोटी 50 लाख रुपये निधीही मिळालाय. त्यातून पहिल्या टप्प्यात 3 बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या एका बसची किंमत 29 लाख 50 हजार रुपये इतकी आहे, या सर्व मिनी, नॉन एसी व डिझेलवर चालणार्‍या बस महिलांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

मागे

डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ
डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

अवकाळी पावसामुळे साथीच्या रोगांचा धोकाही वाढलाय. राज्यात डेंग्यू आणि चिकन....

अधिक वाचा

पुढे  

एसटीची बोरीवली ते व्हाया मुंबई विमानतळ बससेवा सुरू होणार ?
एसटीची बोरीवली ते व्हाया मुंबई विमानतळ बससेवा सुरू होणार ?

महाराष्ट्र राजया मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी बोरीवल....

Read more