By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच राज्यात थंडीला सुरुवात झाली. मुंबईकरही सध्या थंडीचा गारवा अनुभवित आहेत. गेले दोन दिवस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात आले आहे. कालपासून तर अधिक मुंबई गारठल्याचे पाहायला मिळाली. उद्या १७ जानेवारी पर्यंत हीच स्थिति कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
खरे तर दरवर्षी ऑक्टोबर हिटने धामधूम होणार्या प्राणिमात्राला नोव्हेंबरपासून थंडीची चाहूल लागते. मात्र २०२९ मध्ये अगदी वर्षाअखेरपर्यंत पावसानेच हुलकावणी दिल्याने ऑक्टोबर हिट ढगाळ वातावरणात विरला. पुढचे दोन महिनेही वातावरणात फारसा फरक पडला नाही. उलट अधूनमधून पाऊसच हुलकावणी देत होता. त्यामुळे यावर्षी थंडी पडणारच नाही का? असं वाटत आसतानाच नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच थंडीचा चढ-उतार जाणवू लागला आहे. परिणामी मुंबईकरांनीही स्वेटर बाहेर काढले. तर अनेकांनी उबदार कपड्यांची खरेदी केली. काल बुधवारी किमान तापमान २० अंशावरून १६ अंश सेल्सिअसच्याही खाली आले होते. मुंबईत अनेक भागात थंड वारे वाहत होते.
मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १३ ते १८ अंश सेल्सिअस होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड आणि गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. पुढील दोन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई- सध्या देशात आर्थिक मंदीमुळे सर्वत्र चिंतेचे सावट आहे. छोट्....
अधिक वाचा