ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात अजून तीन दिवस उकाडा राहणार कायम

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 05:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात अजून तीन दिवस उकाडा राहणार कायम

शहर : मुंबई

मुंबईसह महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, अजून तीन दिवस उकाडा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर, राज्यात काही ठिकाणी पारा 45 अशांवर पोहचण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. महाबळेश्वर आणि कोकण वगळता राज्यभरात तापमान 40 अंशावर पोहचले आहे. तर, राज्यातील सर्वाधिक तापमान 46.8 अंश सेल्सिअस अकोल्यामध्ये नोंदविण्यात आले.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवला. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही लक्षणीय वाढ झालीय. राज्यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, परभणीमध्ये तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान 44 अंशाच्या पुढे गेले होते. महाबळेश्वर आणि कोकण विभाग वगळता सर्वच ठिकाणी पारा 40 अंशांवर पोहचला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. जिल्ह्यात काल पारा 43 अंशावर पोहचला होता. तर, अजून तीन दिवस नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार नाही. 29 एप्रिलपर्यंत विदर्भाच्या बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुण्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असून काही भागात तापमान 45 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही वाढ होऊन ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार आहे. सोमवारनंतर उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

मागे

आता लवकरच 20 रुपयांची नोट बाजारात
आता लवकरच 20 रुपयांची नोट बाजारात

आता 10 रुपयेच्या नोटीनंतर बाजारात 20 रुपयाची नवीन नोट येणार आहे. रिझर्व्ह बँके....

अधिक वाचा

पुढे  

देगलूर येथे भीषण अपघातात 5 जण ठार
देगलूर येथे भीषण अपघातात 5 जण ठार

देगलूरमध्ये  आज सकाळी भीषण अपघात झाला. मुलाच्या लग्नासाठी हैदराबादला जात ....

Read more