By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 01:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी शाळेवर हल्ला केला. शाळेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांदरम्यान हल्ला केला. शाळेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुसरीकडे द्रबगामध्ये सैन्याच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. सैन्याने परिसराला घेराव घातला आणि तापास सुरू केला आहे.
काल जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात बिगर काश्मिरी असलेले पाच मजूर ठार झाले आहेत. तर इतर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. मारले गेलेले सर्वजण पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी होते, अशी माहिती आहे.
दरम्यान, सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घातला आहे आणि तिथे प्रचंड शोधमोहीम सुरू आहे. अतिरिक्त सुरक्षा दलांना बोलाविण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी मारले गेलेले कामगार पश्चिम बंगालमधील असल्याचे समजते आणि ते रोजंदारी म्हणून काम करत होते, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलीस सूत्रांनी देण्यात आली.
कुलाबा ते सिप्झ या ‘मेट्रो ३’ मार्गासाठी आरेतील अडीच हजार झाडे कापण्याच....
अधिक वाचा