By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : srinagar
श्रीनगर - जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांचे छुपे आणि भ्याड हल्ले सुरूच आहेत. श्रीनगरच्या अनंतनागजवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळवरून पळ काढला.
दरम्यान, गोळीबार सुरू होताच जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच या हल्ल्यानंतर सीआरपीएफ, पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या महितीनुसार, काश्मीर विद्यापीठाच्या आवारातून ग्रेनेड फेकण्यात आले व हे ग्रेनेड सीआरपीएफ ताफ्यावर न पडता सामान्य लोकांजवळ पडला. त्यामुळे दोन नागरिक जखमी झाले आहेत.
वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या या हल्ल्यांत जवान जखमी होत आहेत. ४ जानेवारीला संशयित दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या कावदारा परिसरात सीआरपीएफ ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला होता. तर मागील आठवड्यातही ८ जानेवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला केला होता.
नवी दिल्ली - 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस....
अधिक वाचा