ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकुरांना उच्च न्यायालयाचा दणका ! गोरेगावच्या जनतेचा विजय!

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकुरांना उच्च न्यायालयाचा दणका ! गोरेगावच्या जनतेचा विजय!

शहर : मुंबई

 विद्या ठाकूरांच्या व्हिनसच्या तावडीतून मैदान मुक्त...... क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली बळकावलेलं गोरेगावातलं सार्वजनिक मैदान ताबडतोब खुलं करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने भाजपच्या उमेदवार विद्या ठाकुर यांच्या व्हिनस स्पोर्टस्‌ अकादमीला दिलाय. न्यायालयाच्या या दणक्यामुळे  प्रेम नगरच्या जवळचं, रस्तुमजी टॉवर्सच्या शेजारचं हे मैदान आता व्हिनस क्रिकेट ग्राउंडन राहाता तुम्हा आम्हा सगळ्या गोरेगावकरांसाठी खुलं होईल. व्हिनसच्या या कारनाम्याविरोधात सचिन चव्हाण यांनी गोरेगावकरांच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्हिनस कल्चरल असोसिएशनला हे खुलं मैदान दत्तक दिलं होतं. त्यांच्यातल्या करारानुसार ते मनोरंजनासाठी वापरायचं होतं. मात्र व्हिनसने व्हिनस स्पोर्टस्‌ क्रिकेट अकादमीतर्फे ते बळकावत मैदानातली क्रिकेटची खेळपट्टी वापरायला सुरुवात केली. आठवड्यातून दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी तिथे भरमसाठ फी घेऊन क्रिकेट कोचिंग द्यायला सुरुवात केली आणि त्या वेळात इतरांना मैदानावर प्रवेश बंद केला. आसपासचे रहिवासी, लहान मुलं यांना तिथे खेळणं अवघड झालं.

या विरोधातल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने या मैदानावर विशिष्ट वेळ विशिष्ट अक्टिव्हिटीसाठी राखून ठेवता येणार नाही, कोणत्याही स्पोर्टस्‌ अकादमीला असं करता येणार नाही, असं ठणकावून सांगत हे मैदान सार्वजनिक उद्यानम्हणूनच वापरलं गेलं पाहिजे, असा आदेश दिला आहे.

विद्या ठाकूरांना हा गोरेगावच्या जनतेनं दिलेला पहिला दणका होता .... पुढचा दणका  21 तारखेला निवडणुकीतून द्यायचाय !!!!!!

मागे

मुंबईतील 96 टक्के रस्त्यांची चाळण
मुंबईतील 96 टक्के रस्त्यांची चाळण

मुंबईतील तब्बल 96 टक्के रस्ते खराब स्थितीत असल्याचे रस्ते पाहणी समितीच्या प....

अधिक वाचा

पुढे  

मतदार यादीत तुमचं नाव आहे, हे तुम्ही कसं चेक कराल?
मतदार यादीत तुमचं नाव आहे, हे तुम्ही कसं चेक कराल?

मतदार यादीत नाव शोधणे तुम्हाला वाटू शकतं गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार य....

Read more