By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
सध्या सुरू असलेल्या मंदीचा फटका हळू हळू छोट्या उद्योगांना बसू लागला आहे. आशियातील सर्वात मोठी वसाहत म्हणून ओळखणार्या ठाणे बेलापुर औद्योगिक वसाहतीत उद्योगांना घरघर लागलेली दिसत आहे.
ह्या उद्योगांमध्ये असलेल्या कारखानदारांनी आर्थिक मंदीमुळे कामगारांचे पगार थकविले असून काहीनी आपली जमीन विकून दुसर्या राज्यात स्थलांतर केले आहे. तर उत्पादनही रोडावले आहे. त्यामुळे काही काळातच ह्या औद्योगिक पट्ट्यात सेवा क्षेत्राचा विस्तार होईल असा अंदाज आहे.
या औद्योगिक वसाहतीत छोटे मोठे 950 हून अधिक कारखाने आहेत. वाढते आणि बदलते कर ह्यामुळे खर्चाचा ताळेबंद ठेवायला छोट्या उद्योगांना कसरत करावी लागत आहे. मोठ्या उद्योगांकडून येणार्या कामाच्या जोरावरच छोट्या उद्योगाचे गाडे चालत असते मात्र मोठ्या उद्योगांकडून काम मिळत नसल्याने छोटे कारखानदारांची आर्थिक स्थिती खालावली आहे. तर काही ठिकाणी केलेले उत्पादनाला मागणी नसल्याने गोडाउनमध्येच पडून आहे.
जवळ पास दीड महिन्याच्या तपश्चर्येनंतर शनिवारी रात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान भ....
अधिक वाचा