By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
आज सर्व्हिस रोडवर सुरु असणाऱया कामामुळे गॅस पाइप लाइनला जेसीबीचा धक्का लागल्याने ती फुटली.
ठाण्यामधील पाचपाखाडी भागात सर्व्हिस रोडवर महानगरपालिकेच्या माध्यमातून खोदकाम सुरु आहे. येथून जाणाऱया जेसीबीचा गॅसच्या पाइप लाइनला धक्का लागला. त्यामुळे ही पाइप लाइन फुटली आणि त्यामधून मोठय़ा प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागला.
अग्निशामन दल आणि गॅस कंपनीशी संबंधित अधिकार्यानी घटनास्थळी धाव घेतली. पाइप लाइनमधून होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाच ते सहा हजार ठाणेकरांना पाइप लाइनद्वारे होणार गॅस पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
अनुसूचित जाती आणि जमातींना संरक्षण देणाऱया ऍट्रॉसिटी कायद्याच्या कोणत्या....
अधिक वाचा