By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 06, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
ठाणे : ठाणे शहरासाठी अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मंजुरी दिली. ठाणे, भिवंडी, कल्याण मेट्रोला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागणार, असा विश्वास आमदार एकनाथ शिंदे व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मेट्रोसाठी १५ स्थानके उभारली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात नवे ठाणे स्थानक, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, घोडबंदर रोड, राबोडी, ठाणे स्थानक, नौपाडा, नवे ठाणे स्थानक असा मार्ग असणार आहे, तर दुसर्या टप्प्यात विटावा, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, कौसा, शीळ फाटा, महापे, रबाळे, ऐरोली, विटावा असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे.
ठाण्यात अंतर्गत मेट्रो ठाणे शहरांतर्गतही वाहतुकीची समस्या निकाली काढून ठाणेकरांना वाहतुकीचा प्रभावी पर्याय मिळावा, यासाठी शिंदे यांनी प्रयत्न केले.
जिकडे - तिकडे मुलींच्या तोकड्या कपड्यावरून वाद निर्माण होताना आपण सर्वत्र ....
अधिक वाचा