ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकाच दिवशी जन्म, एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग आणि एकाच आजाराने घात, जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने मृत्

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकाच दिवशी जन्म, एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग आणि एकाच आजाराने घात, जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने मृत्

शहर : ठाणे

एकाच दिवशी जगात पहिले पाऊल ठेवलेल्या जुळ्या भावंडांचा एकाच आजाराने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ठाणे पोलीस दलातील जुळ्या भावांचा अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने कोरोनामुळे मृत्यू झाला. एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग असा प्रवास एकत्र केलेल्या या भावांचा करुण अंतही सारखाच झाला.

दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलीप आणि जयसिंग हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग घोडके हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

घोडके बंधू 2023 मध्ये एकाच दिवशी निवृत्तही झाले असते. मात्र नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं. आठ दिवसांपूर्वी 20 जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर 28 जुलै रोजी जयसिंग यांची प्राणज्योत मालवली, ती कोरोनामुळेच.

अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला, त्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. यामुळे पोलीस दलातही मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

याआधी, मुंबईतील विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील यांचं 9 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झालं होतं. धक्कादायक म्हणजे सचिन पाटील यांचा भाऊ नितीन हे देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना काही दिवसांपूर्वी त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता.

 

मागे

वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद, कोरोना कक्षात रुग्णाचा तडफडून मृत्यू
वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद, कोरोना कक्षात रुग्णाचा तडफडून मृत्यू

कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही – गडकरी
कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही – गडकरी

देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्यान....

Read more