By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
नवी दिल्ली - भारतात सणवार असल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे, बस, एसटी जादा सोडल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत असते. भारतात सणांची धूम असल्यानंतर किंवा दिवाळी व उन्हाळी सुट्ट्या पडल्यानंतर रेल्वे तिकीट, बस तिकीट, विमान तिकिट महाग होणार हे आपल्याकडे दरवर्षी होत असते.
परंतु, परदेशात या समस्या काही वेगळ्याच आहेत. अमेरिकेत सध्या सुट्टीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकन लोक जगभरात भ्रमंती तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. यासाठी ते सर्वात जास्त विमानाचा प्रवास करीत आहेत. त्यामुळे अमेरिकेत चक्क विमानाची वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेत २१ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत सुट्टी दिली जाते. त्यामुळे या दिवसात लाखो अमेरिकन लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. यासाठी ते विमान प्रवास करतात. अमेरिकेत २४ ते २६ डिसेंबर दरम्यान जवळपास ७० लाख लोकांनी विमान प्रवास केला.
एकाचवेळी विमानाचा इतका मोठा प्रवास झाल्याने या काळात आकाशात विमानाची वाहतूक कोंडी झाली होती. अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशनच्या माहितीनुसार, अमेरिकेत सध्या १२ हजारांहून अधिक विमान आकाशात झेपावतात. म्हणजेच २१ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत ७० लाख विमानाचे उड्डान होणार आहेत. अमेरिकेतून जवळपास १०.४० कोटी लोक २१ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत सुट्टीचा आनंद घेणार आहेत, असेही यात म्हटले आहे.
अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्याही खूप आहे. ३९ लाख लोकांनी आपल्या कारचा उपयोग करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास केल्याचे अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशनने म्हटले आहे. तर ३८.१० लाख लोक या काळात रेल्वे, बस आणि क्रुझ शीपचा वापर करणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा ३ टक्के जास्त आहे.
मुंबई - मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत नो पार्किं....
अधिक वाचा