By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : उस्मानाबाद
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सकाळी पावणेदहाच्या सुमारास 7 ते 8 मुले नदीत बुडाल्याची दुर्घटना घडली. येथील बोरी नदीमध्ये फरुख नय्यरआझम काझी यांचे कुटुंब बोटीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत असताना अचानक बोट पलटी झाली. या बोटीत 9 प्रवासी होते.
बोरी नदीतील या बोटीत चालकासह 10 प्रवासी होते. त्यापैकी 7 जण पाण्यातून जिवंत सुखरुप बाहेर आले, तर 3 प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एक मुलगी पाण्यातून बाहेर काढून उपचारादरम्यान दवाखान्यात मरण पावली तर 2 मुले पाण्यातच बुडून मयत झाले आहेत. त्यापैकी एका मुललीला पाण्यातून 12:20 वाजता बाहेर काढण्यात आले व आखणी एक मुलगा पाण्यात असून त्याला बाहेर काढण्याचे शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.
उत्तरप्रदेशच्या कामपूरमध्ये शुक्रवारी रात्री हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्....
अधिक वाचा