ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला

शहर : मुंबई

मुंबईच्या घाटकोपरमध्ये उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला आहे. शीतल भानुशाली असं या महिलेचं नाव आहे. हाजीअली समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला.

घाटकोपर परिसरातील असल्फा या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती. दळण आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांनी दुसऱ्या मार्गावरुन जाण्याचा निर्णय घेतला. पण याच दरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या. अखेर त्यांचा मृतदेह हाजीअली किनारी आढळला.

मुंबईत पावसाळ्यात अशा घटना घडतात. त्यामुळे सावधानता बाळगण्याची सूचना वेळोवेळी दिली जाते. काही दिवसांपासून मुंबईत पाऊस असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. यावेळी मॅनहोल उघडे ठेवून साचलेल्या पाण्याला वाट करुन दिली जाते. मात्र या उघड्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

तीन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या तुफान पावसात बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा मृतदेह वरळी समुद्रकिनारी सापडला होता. मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचा मृतदेह वरळीजवळ सापडला होता.

मागे

हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु
हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. काही नि....

अधिक वाचा

पुढे  

हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट, उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणांचा दावा
हाथरसच्या बहाण्याने यूपीत जातीय दंगली भडकवण्याचा कट, उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणांचा दावा

हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगलीच्या आगीत यूपीला जाळून टाकण्याचे....

Read more