By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 04:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून पूरग्रस्त राज्यांना ६ हजार कोटींची मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २०१९ मध्ये देशातील सात राज्यांना पुराचा फटका बसला होता. तर २०१८ आणि २०१९ मध्ये केरळ राज्याला सलग दोन वर्ष पुराचा फटका बसला होता. मात्र जाहीर केलेल्या मदतनिधीच्या त्या सात राज्यामध्ये केरळ राज्याचा समावेश करण्यात आला नाही.
केरळ भाजप विरोधी पक्षाची सत्ता असल्यामुळे मोदी सरकारने मदत करण्याचे टाळले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूरग्रस्त राज्यांना मदतनिधी देण्यात आला असून यामध्ये आसाम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना मदतनिधी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. मात्र केरळ राज्याला का वगळण्यात आले असावे? मोदी सरकारने असे का केले असावे? ते अजून काहीच स्पष्ट झाले नाही. केरळचे मुख्यमंत्री थॉमस इसाक यांनी केंद्र सरकारकडून मदतनिधी नाकारल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई - भारतातील सर्वांत मोठ्या बँकेच्या यादीतील खासगी क्षेत्....
अधिक वाचा