ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

थुंकीने फोन अनलॉक करण्याचे चॅलेंज झालं व्हायरल

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 03:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

थुंकीने फोन अनलॉक करण्याचे चॅलेंज झालं व्हायरल

शहर : देश

          सोशल मिडियावर रोज काही ना काही नवीन घडत असतं. भारतामध्येही हे वर्ष वेगवगेळ्या सोशल मिडिया चॅलेंजने गाजलं. यामध्ये अगदी बाला चॅलेंज, योगा चॅलेंज, किकी, डेले अॅली, वॉट दि फ्लफ, बॉटल कॅप, आइस बकेट, १० इयर्स चॅलेंजपासून ते अगदी नुकतेच लोकप्रिय झालेल्या फोमो चॅलेंजचाही उल्लेख करता येतील. अशाचप्रकारे पदरदेशामध्येही टेड पॉड चॅलेंज, मोमो चॅलेंज, चोकींग चॅलेंज, पास आऊट चॅलेंज, मॅनेक्यु चॅलेंज, इट इट ऑर वेअर इट चॅलेंज अशी अनेक चॅलेंजेच मागील काही वर्षांमध्ये व्हायरल झाली. मात्र आता वर्ष संपता संपता एका खूपच विचित्र चॅलेंज व्हायरल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हे चॅलेंज आहे तुमच्या स्वत:चा फोन थुंकीच्या सहाय्याने अनलॉक करण्याचे चॅलेंज.

            टिकटॉकवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुणी स्वत:चा आयफोन त्यावर थुंकून अनलॉक करण्याचा प्रयत्न करताना दिसते. स्वत:ची थुंकी (सलायव्हा) वापरुन फोन ओपन करण्याचा प्रयत्न करत असणारा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला. झालं असं कीही जेसिका बार्नियर ही तरुणी तिच्या प्रियकराबरोबर एका हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी जेसिका स्वत:चा फोन अनलॉक करण्यासाठी स्क्रीनवर थुंकली. तिचा प्रियकर रेयान टीटो याने हा सर्वप्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो टिकटॉकवर पोस्ट केला, अशी माहिती लॅडबायबल या वेबसाईटने दिली आहे.

         आपल्या प्रेयसीने अशाप्रकारे मोबाइल अनलॉक करणं रियानला आवडलं नाही. त्यामुळेच हा व्हिडिओ शेअर करताना त्याने “मी हिच्याबरोबर अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाण्याची शेवटची वेळ आहे,” असं कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

           मात्र जो फोन आपण कानाला लावतो तो थुंकींच्या मदतीने अनलॉक करण्याचा वेडेपणा कोण आणि कशाला करेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र अशाप्रकारे फोन अनलॉक करणारी जेसिका ही एकटीच नसून ‘सलाइव्हा फोन अनलॉकिंग’ नावाची संपूर्ण कम्युनिटीच इंटरनेटवर अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे टिकटॉकबरोबर युट्यूब आणि इतर सोशल नेटवर्किग साईटवरही असे व्हिडिओ पोस्ट केल्याचे पहायला मिळत आहे.

मागे

कोकण रेल्वे मार्गावर आता मेगाब्लॉक, या गाड्यांना फटका
कोकण रेल्वे मार्गावर आता मेगाब्लॉक, या गाड्यांना फटका

             मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची भीती
भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची भीती

           जळगाव - एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा या गावानजीकच्या महामा....

Read more