By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नागरिकत्व संशोधन विधेयक सोमवारी रात्री लोकसभेत पास झाले. रात्री 12.04 वाजता झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 मत पडले. या विधेयकावर अंदाजे 14 तास वाद-विवाद झाले. विरोधकांनी विधेयकाला धर्माच्या आधारे विभाजन करणारे म्हटले. गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर देताना, विधेयकाला त्रासातून मुक्त होण्याचे विधेयक आणि याचा मुस्लिमांशी काहीच संबंध नसल्याचे म्हटले. शाह म्हणाले की, हे विधेयक तीन देशातील अल्पसंख्यांकासाठी आहे. यात त्या देशातील मुस्लिमांचा समावेश होणार नाही. हे विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नागरिकत्व संशोधन विधेयक 2019 सादर केले. भाजपने आपल्या सर्वच खासदारांना व्हिप जारी करून पुढील तीन दिवस सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले. नागरिकत्व संशोधन विधेयक लोकसभेत सादर करण्याची ही दुसरी वेळ आहे. मोदी सरकारच्या या विधेयकायाला काँग्रेससह 11 राजकीय पक्षांचा विरोध आहे. तर आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल यांनी विधेयकाच्या विरोधात संसद परिसरात निदर्शने केली. यात नव्याने नागरिकत्व देताना शरणार्थींना 25 वर्षे मतदानाचा हक्क देऊ नका अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी लोकसभेत नागरिकत्व संशोधन विध....
अधिक वाचा