By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंदीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली. त्या घोषनेने कॉर्पोरेट सेक्टर ला एक मोठा दिलासा मिळणार आहे.
या वेळी घोषणा करताना त्यांनी कंपनी करात कपात करण्याचा सरकारचा निर्णय घोषित केला. या घोषणेमुळे व्यापाराला चालना मिळणार असल्याने व मंदीच्या काळात होणारे नुकसान टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे पडसाद ही लगेचच दिसून आले. आणि शेअर बाजाराला तेजी आली.
उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कपातीनंतर कोणतीही सूट न घेणाऱ्या देशातील कंपन्या आणि देशातील नव्या उत्पादन कंपन्यांना आता 25.17 टक्के कर द्यावा लागणार आहे.
तसंच याव्यतिरिक्त कंपन्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. तरच देशातील कंपन्यांवार लागणारा MAT देखील न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कॅपिटल गेनवर लागणारा सरचार्जही आता आकारण्यात येणार नाही.
हे नवे दर ह्या वर्षीपासूनच लागू होणार आहेत. ह्या निर्णयानंतर वार्षिक महसूल 1.45 लाख कोटी राहणार आहे. देशातील मंदीच्या काळात उद्योग उभारणीच्या क्षेत्रात हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.
गुंतवणूक आणि विकास दर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 1 ऑक्टोबरनंतर सुरू होणाऱ्या उत्पादन कंपन्यांकडून 15 टक्के कंपनी कर आकारण्यात येणार आहे. सरचार्ज आणि सेससह हा दर 17.01 टक्के होणार आहे.
शेअर बाजार 1600 अंकांनी वधारला!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोर्पोरेट टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात तेजी आली. बीएसईचा निर्देशांक 1600 अंकांनी उसळून 37,767.13 वर पोहोचला. गेले काही दिवस शेअर बाजारात आलेली मरगळ अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे थोडीबहुत दूर झाली.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक....
अधिक वाचा