By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगल तोडीला विरोधकरण्याच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर नाणारमधील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याच्या आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
कोकणातील निसर्ग संपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गंच्या सीमेवर राजापुरातील नाणार येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित होता. या प्रकल्पाचा विस्तार राजापूर तालुक्यातील १४ गाव आणि सिंधुदुर्गंतील देवगडमधील २ गावांमध्ये होणार होता. १३ हजार एकर जागा या प्रकल्पासाठी लागणार होती. हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारल्या होत्या. यासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पापासून अवघ्या १५-१६ कि.मी. अंतरावर जैतापूर अणुउर्जा प्रकल्प आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा म्हणूनस्थानिकांनी जोरदार विरोध केला. शिवसेनेनेही हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला. मात्र नाणार प्रकल्प विरोधात आंदोलनकर्त्यांवर त्यावेळी विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता या आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
भारतीयांची सकाळ एका ‘गुड न्यूज’ने होणार आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी....
अधिक वाचा