ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 05, 2023 07:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश

शहर : मुंबई

अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

मुंबई लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडणाच्या घटना दररोज समोर येत असतात. दरम्यान एका घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या घरच्यांना 8 लाखांची भरपाई मिळणार आहे. पण ही भरपाई तब्बल 13 वर्षांनंतर मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला यासंदर्भातील आदेश दिला आहे. 

अरुण धोत्रे यांच्या मुलगा अल्पेश याचा पश्चिम रेल्वेतून प्रवास करताना पडून मृ्त्यू झाला होता. यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अपिलावर सुनावणी घेताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. धोत्रे यांचा मुलगा 26 जानेवारी 2010 रोजी मित्रांसोबत भाईंदर ते वसई दरम्यान रेल्वेने जात होता. नायगाव ते वसई स्थानकादरम्यान गाडी येताच डब्यात प्रचंड गर्दी झाल्याने तो खाली पडला आणि त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तो 20 वर्षांचा होता.

दरम्यान 13 वर्षांनी याप्रकरणाचा निकाल आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सहा आठवड्यांच्या आत भरपाईची रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. ही रक्कम तरुणाचे वडील अरुण धोत्रे यांना देण्यात येणार आहे.

नुकसानभरपाईसाठी दावा 

आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर धोत्रे यांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे मुंबई खंडपीठाकडे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. ट्रिब्युनलने 21 एप्रिल 2014 रोजी धोत्रे यांचा अर्ज फेटाळला होता. आपल्या मुलाचा मृत्यू अपघाती असल्याचे सिद्ध करण्यात धोत्रे अपयशी ठरल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले होते. दरम्यान अरुण धोत्रे हे त्यावेळी मुलावर अवलंबून होते. न्यायाधिकरणाच्या आदेशावर असमाधानी असलेल्या धोत्रे यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक

न्यायालयाने विचारला  प्रश्न

मुलगा अल्पेशचा मृत्यू हा निष्काळजीपणामुळे झाल्याचा दावा वडिल अरुण धोत्रे यांनी केला होता. पण तो रेल्वे कायद्याच्या कलमांतर्गत अपघाताच्या व्याख्येत येत नाही, असे रेल्वेच्या वकिलांचे म्हणणे होते. प्रवासी खचाखच भरलेल्या ट्रेनच्या फूटबोर्डवर उभे राहिल्याने त्याला बेफिकीर म्हणता येईल का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. गर्दीच्या वेळी लोक ऑफिस, घर आणि कॉलेजला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वेच्या वकिलाच्या युक्तिवादावर न्यायालयाने ही टिप्पणी केली. 

२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन होता. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. अशा परिस्थितीत गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गर्दीमुळे तरुणाचा मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. असे असले तरी अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

 

Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे |

 

#garjahindustan#press#pressconference#Live#livenews#maharashtrapolitics#marathinews #indiapolitics #maharashtratoday#suprimcourt#Horoscope #dailyprediction #shivsena#BJP#congress#ncp#mns#ajitPawar#devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray#rajthackeray#adityathackeray #eknathshinde#supriyasulefc #jayantpatil #sanjayraut #abhijitpanse#bachukadu#pankajamunde #dhananjaymunde #rohitpawar#amolklohe#DCM#narendramodi #chhaganbhujbal #balasahebthackeray #mazavitthal #vitthal #mumbaicharaja #lalbaghcharaja #monsoon #rainupdates#maharashtrarainupdates

 

मागे

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्
म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, ....

अधिक वाचा

पुढे  

चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज
चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'सॉफ्ट लँडिंग' के....

Read more