ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा

शहर : देश

            नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह याच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षेविरोधात दाखल केलेली फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. या प्रकरणात दोषीच्या वकिलाला पूर्ण संधी दिली गेली. मात्र, त्यांनी कोणतीही नवीन बाब सांगितली नाही. 


         दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने आधीच फेटाळल्या आहेत. निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयकुमार सिंह याची फेरविचार याचिका न्यायमूर्ती भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. 'हा युक्तिवाद आम्ही याआधीच ऐकून घेतला आहे,' असं कोर्टानं नमूद केलं. 


          अक्षयकुमार सिंहच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा हवाला देतानाच, फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. त्यावर कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं होतं.


             निर्भया प्रकरणातील आणखी एक दोषी विनयच्या दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. आता अक्षयची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 

मागे

रेशन दुकानांवर स्वस्त दरात मिळणार  चिकन आणि  मटणही
रेशन दुकानांवर स्वस्त दरात मिळणार चिकन आणि मटणही

            नवी दिल्ली - सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधा....

अधिक वाचा

पुढे  

कांद्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
कांद्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

           नाशिक - लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने प....

Read more