By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ब्युटीशियन्स आणि फिटनेस ट्रेनर आदि स्वतंत्र्यरित्या काम करणारे कामगार आतापर्यंत वस्तु व सेवा कराच्या (जीएसटी) टप्प्यात आणले गेले नव्हते. तथापि, आता हे कामगारही केंद्र सरकारच्या नजरेत आले आहेत. महसूल वाढविण्यासाठी हे कामगारही जीएसटीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकार अशा कामगारांना ऑनलाइन कामे देणार्या कंपन्यांचे सहकार्य घेत असल्याचे कळते. जीएसटी नंबर असलेल्या कामगारांनाच कामे देण्याची सक्ती या कंपन्यांवर केली जाणार आहे.
केंद्र सरकारचा डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) हा विभाग यावर काम करीत आहे. अर्बनक्लॅप, हाऊसजॉय, ब्रोफॉरयू आदि वेबसाइटवर ऑनलाइन कामे दिली जातात. देशातील लाखो कामगारांची अशा वेबसाईटवर नोंदणी आहे. काम असेल तर त्यांना ऑनलाइन कळविले जाते. अशा कामगारांना जीएसटीच्या टप्प्यात आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. ऑनलाइन वेबसाईटवर नोंदणी केलेल्या बहुतांश कामगारांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी द्यावा लागणार नाही, असे डीपीआआयटीमधील अधिकार्यांचे म्हणणे आहे. स्वतंत्ररित्या काम करणार्या कामगारांना इतर कामगारांच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार त्यांची माहिती जमा करीत असल्याचे या अधिकार्यांनी म्हंटले आहे.
मुंबई - लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या....
अधिक वाचा