ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार - गृहराज्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 03:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार - गृहराज्यमंत्री

शहर : मुंबई

राज्यात मराठा आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी उद्रेक पाहायला मिळाला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.

पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. यासंदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत गृहराज्यमंत्री केसरकर यांची एक बैठक झाली. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, मराठा समाज शिष्टमंडळातील प्रतिनिधी राजेंद्र निकम, दिलीप पाटील, बाबा गुंजाळ, रुपेश मांजरेकर, संजय पाटील, विवेक सावंत, स्नेहा गावकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर केसरकर यांनी हे आश्वासन दिले.आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती. पोलिसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. त्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आहे

दरम्यान, आंदोलकांवरील मागे घ्यावयाच्या गुन्ह्यांबाबत पोलीस महांचालकांकडून प्राप्त झालेला अहवाल विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील अभिप्राय मिळाल्यानंतर उपसमितीची बैठक घेतली जाईल. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली.

मागे

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात, डंपर दोन चाकांवर हवेत उभा
सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात, डंपर दोन चाकांवर हवेत उभा

सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात खांदा कॉलनी उड्डाण पुलावर झाला. दिशादर्....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म....

Read more