By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
स्वस्त इंटरनेट आणि स्मार्टफोन यामुळे भारतात यूट्यूबचा वापर अधिक वाढलेला आहे. भारताने यूट्यूबच्या
वापरात अमेरिकेलाही मागे टाकले आहे. स्थानिक भाषेतील संगीत ऐकणे, आरोग्यसंबंधी
माहिती जाणून घेणे, पाकलासंबंधी, शैक्षणिकसंबंधी माहिती जाणून घेण्यात भारताने पहिला नंबर पटकावला आहे.
भारतात आजघडीला युट्यूबचे २६.५ कोटी सब्सक्राईबर आहेत. यातील अर्ध्याहून लोक स्थानिक भाषांना प्राधान्य
देत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. जगात सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा भारतात उपलब्ध आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने टेलिकॉम
क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर स्वस्तातील इंटरनेट डेटा ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. दोन-तीन वर्षापूर्वी वन जीबीसाठी
शंभर रुपये मोजावे लागायचे आणि आता अवघ्या १० रुपयात इंटरनेट डेटा उपलब्ध होत आहे. भारतात स्थानिक
भाषेतील ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याला लोकांनी जास्तीची पसंती दिली आहे.
भारतात मोबाइलच्या वापरात ८५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातील सहा मेट्रो शहरात यूट्यूबच्या
वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. २०१६ पर्यंत काही एमबी डेटा खर्च करणारे भारतीय लोक आता महिन्याला
१० जीबीपेक्षा जास्त डेटा खर्च करीत आहेत. भारतात संगीत, तंत्रज्ञान, सौंदर्य, आरोग्य, फिटनेस, डान्स आणि
फूड यासंबंधीचे व्हिडिओ पाहायला लोकांचा जास्त कल आहे, असे यूट्यूबने सांगितले. २०१८ मध्ये शैक्षणिकसंबंधीचे
व्हिडिओ, यांची अधिक माहिती जाणून घेण्यात लक्षणीय वाढ झाल्याचेही यूट्यूबकडून सांगण्यात आले आहे.
जगभराच्या तुलनेत भारतात यूट्यूब पाहणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इंटरटेनमेंट आणि माहिती मिळवण्यासाठी ग्राहक
युट्यूबकडे वळत आहेत, असे यूट्यूबचे सीईओ सुसान वोसिकी यांनी सांगितले.
आता मुंबई उपवगरीय रेल्वे मार्गावर ओळखता येणार तोतया तिकीट तपासनीसांना.. र....
अधिक वाचा