By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वैद्यकीय शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केलं आहे. सरकारनं आरक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्यानं ते संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर घोषणाबाजी केली आहे. मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण जाहीर केलेलं असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेत का सामावून घेतलं जात नाही, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.
सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गात मोडणाऱ्या मराठा व इतर विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सर्व प्रवेश रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्याची राज्य सीईटी सेलची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली होती. तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या प्रकरणात पक्षकार नसल्यामुळे असे स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे सेलला सांगण्यात आले.
असे स्पष्टीकरण मागितल्यामुळे सेलची कानउघाडणी करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतील जागा एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने २ मे रोजी दिला होता. त्यात संबंधित स्पष्टीकरण द्यावे असे सेलचे म्हणणे होते. एसईबीसी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे आरक्षणाविरुद्धच्या याचिकांवरील निर्णयाधीन राहतील असे न्यायालयाने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. तसेच अंतिम निर्णयातही सर्व आवश्यक मुद्दे नमूद केले. असे असताना संबंधित स्पष्टकरण मागितल्यामुळे सेलला न्यायालयाचा दणका सहन करावा लागला होता.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला दिलेले आर....
अधिक वाचा