ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,574 वर, मृतांचा आकडा 110; घरगुती विलगीकरणात 38937 व्यक्ती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 11, 2020 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,574 वर, मृतांचा आकडा 110; घरगुती विलगीकरणात 38937 व्यक्ती

शहर : पुणे

गुरुवारप्रमाणे शुक्रवारीही राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने द्विशतक गाठले. एकूण रुग्णांचा आकडा तब्बल १५७४ वर पोहोचला आहे. राज्यात शुक्रवारी २१० नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी १३२ रुग्ण हे मुंबईतील असून पुण्यात ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात १३ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला. पैकी १० मृत्यू हे मुंबईतील आहेत. राज्यातील एकूण मृतांचा आकडा ११० वर गेला आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३३,०९३ नमुन्यांपैकी ३०,४७७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८९३७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

पुणे -: ३८ नवीन रुग्ण

जिल्ह्यात शुक्रवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात ३६, तर पिंपरी चिंचवडमध्ये २ असे एकूण ३८ नवीन रुग्ण आढळले. मृतांत एक ६७ वर्षीय मधुमेहग्रस्त महिला आहे. दुसरा रुग्ण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा ३० वर्षीय गतिमंद तरुण आहे. पुणे परिसरातील काेराेनाबाधितांचा आकडा २४६ वर पाेहोचला अाहे.

राज्यातील रुग्णसंख्या

मुंबई १००८, ठाणे ३, ठाणे मनपा २८, नवी मुंबई ३२, कल्याण डोंबिवली ३४, उल्हासनगर १, मीरा-भाईंदर २१, पालघर ३, वसई विरार १२, पनवेल ६, नाशिक मंडळ ३४, पुणे मंडळ २५४, कोल्हापूर मंडळ ३७, औरंगाबाद मंडळ १९, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ३४, नागपूर मंडळ २६ इतर राज्ये ९.

मिरज -: २४ जण निगेटिव्ह

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे कोरोनाचे २६ रुग्ण अाढळले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी २४ रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित िवलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

अकोला- : ४ रुग्ण : जिल्ह्यात शुक्रवारी ४ रुग्ण आढळले. तिघे एकाच कुटुंबातील आहेत. आधी आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने या चौघांना लागण झाली.

धुळे -: पहिला बळी : २ जण पाॅझिटिव्ह निघाले आहेत. साक्रीच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. दुसऱ्या २२ वर्षीय रुग्ण महिलेचीही प्रकृती गंभीर अाहे.

मागे

ICMRचा धक्कादायक रिपोर्ट, भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये
ICMRचा धक्कादायक रिपोर्ट, भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये

देशात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढत आहे. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये दि....

अधिक वाचा

पुढे  

धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण
धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण

शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी....

Read more