By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे जिल्ह्यात वाहनांच्या संख्येने ६१ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि लगतच्या भागातील वाहनांची संख्या जवळपास ३९ लाख एवढी झालीय. तसेच मागील दोन वर्षाच्या तुलनेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१८-१९ मध्ये वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर, मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे. त्यामध्ये तब्बल ३ लाख केवळ दुचाकी आहेत. मागील काही वर्षांपासून पुणे शहर आणि लगतच्या परिसरातील उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी वेगाने वाढत गेल्याने लोकवस्ती वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत गेली. आरटीओच्या पुणे विभागामध्ये पुणे (एमएच १२), पिंपरी चिंचवड (एमएच १४) व बारामती (एमएच ४२) हे तीन जिल्ह्यातील विभाग आहेत. त्याचबरोबर सोलापुर व अकलुज हे दोन विभागही येतात. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एकुण वाहनांची संख्या मार्च २०१८ अखेरीस ३८ लाख ८८ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये साहजिकच पुणे शहराचा वाटा अधिक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १८ लाख ७५ हजार तर बारामतीमध्ये ४ लाख ६ हजार अशी एकुण ६१ लाख ७० हजार वाहने विभागात नोंदविली गेली आहेत. मागील वर्षभरात पुण्यामध्ये २ लाख ६१, पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ५४ हजार तर बारामतीमध्ये ३१ हजार ५०० वाहनांची नोंदणी झाली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. का....
अधिक वाचा