By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 13, 2019 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कुर्ला स्थानकावर लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबत विक्रेत्याच्या स्टॉलला टाळे ठोकले. तर, या विक्रेत्याच्या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते. नमुन्यांच्या तपासणीनंतर लिंबू सरबत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे या विक्रेत्याला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, तपासणीनंतर लिंबू सरबतामुळे प्रवाशांना न्युमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच ई-कोलाय हे जीवाणू जास्त आढळून आले. त्यांच्यामुळे प्रवाशांमध्ये ताण वाढणे, अतिसार होऊ शकतो. त्यामुळे विक्रेत्यावर कारवाई करून रेल्वे प्रशासनाने स्टॉलधारकावर पाच लाख रूपये दंड ठोठावला आहे.
नांदेड येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरे....
अधिक वाचा