ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फ्लोरिडात प्रवासी विमान नदीत कोसळले,सुदैवाने जीवितहानी नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 04, 2019 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फ्लोरिडात प्रवासी विमान नदीत कोसळले,सुदैवाने  जीवितहानी नाही

शहर : विदेश

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये बोइंग ७३७ हे प्रवासी विमान लॅंडिंग करताना नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या विमानात १४० लोक होते. परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. बोइंग ७३७ हे विमान नवल एयर जॅक्शनविले येथील रनवे वरुन थेट सेंट जॉन्स नदीत कोसळले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

विमानात १४० लोकांपैकी १३३ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर होते. विमान नदीन कोसळ्यानंतर क्रॅश झाले नाही त्यामुळे ते न बुडल्याने जिवितहानी टळली आहे. घटनास्थळी जेएसओ मरीन यूनिटला बोलवण्यात आले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. विमानातून बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून सर्व प्रवासी सुुखरुप आहेत.

 

मागे

PhonePe, M-Pesa सहीत पाच कंपन्यांवर RBI ची कारवाई
PhonePe, M-Pesa सहीत पाच कंपन्यांवर RBI ची कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) व्होडाफोन एम-पैसा (M Pesa) आणि फोन पेसहीत प्रीपेड पेमे....

अधिक वाचा

पुढे  

राफेल डील प्रकरण  :गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केल्यास देशाला धोका  केंद्राची SC मध्ये माहिती
राफेल डील प्रकरण :गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केल्यास देशाला धोका केंद्राची SC मध्ये माहिती

राफेल डील (Rafale Deal) प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर केंद्र स....

Read more