By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 11:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
कोरोनाचा धोका वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला मोठे यश मिळत आहे. महाराष्ट्रात स्वदेशी कोरोना लशीच्या चाचणीला नागपुरात सुरुवात झाली आहे. भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज नागपुरात देण्यात येत आहे. नागपुरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २७ जुलैला पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी तीन जणांना पहिला डोस देण्यात आला होता. त्यानंतर सात दिवसांत ५५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली. गेल्या १४ दिवसात त्यांची प्रकृती उत्तम असून कोणताही दुष्परिणाण दिसून आलेला नाही. त्यांचा रक्ताचा अहवाल दिल्लीला सेंट्रल लॅबकडे पाठवण्यात आला आहे.आता त्यातील सात जणांना आज दुसरा डोस देण्यात येत आहे. देशात १२ केंद्रांवर या कोव्हॅक्सिनच्या या चाचण्या होत असून५५ व्यक्तींना लस दिल्यानंतर १४दिवसांनी दुसरा डोस देण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा रिझल्ट काय येतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे.
पहिला डोस दिल्यानंतर लोकांना काही त्रास झालेला नाही तसेच काही साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत, असे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. पहिला डोस दिल्यानंतर त्यांना दोन तास रुग्णालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले. त्यांना काहीच त्रास किंवा साइड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले.
नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये २५ आणि३१ वर्षांच्या दोन तरुणांचा समावेश आहे. तसेच ५३ वर्षीय महिलेनेही यात सहभाग घेतला आहे. हे लोक चाचणीसाठी घालून दिलेल्या निकषांनुसार योग्य आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे इतर आजार नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
सहकारी साखर कारखान्यांनी कोरोना रुग्णालयाची निर्मिती करावी, असे आवाहन राष....
अधिक वाचा