ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमेरिका-इराण हल्यामुळे बाजार घसरला

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमेरिका-इराण हल्यामुळे बाजार घसरला

शहर : देश

        आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱया घडामोडींचा जागतिक शेअर बाजारांसोबत देशातील व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रावर या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होत असतो. तसेच शुक्रवारी अमेरिकेकडून भौगोलिक वादाच्या कारणास्तव दराणच्या विमानतळावर हल्ला केला आहे. 


        यामध्ये इराणचे जनरल सुलेमान यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे जगातील विविध देशांना कच्च्या तेलाच्या होणाऱया पुवरठय़ावर नकारात्मक प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे देशातील बाजारात सप्ताहाच्या अंतिम सत्रात शुक्रवारी घसरणीची नोंद झाली आहे.


          दरम्यान, शुक्रवारी सेन्सेक्स दिवसअखेर 162.03 टक्क्यांनी  घसरुन निर्देशांक 41,464.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 55.55 अंकानी घसरुन निर्देशांक 12,226.65 वर बंद झाला आहे.   


        दिग्गज कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.16 टक्क्यांनी घसरले आहेत. तर सोबत ऍक्सिस बँक, बजाज ऑटो, स्टेट बँक, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरले आहेत.  शेअर बाजरात शुक्रवारी सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेल यांचे समभाग मात्र 2.08 टक्क्यांनी वधारले आहेत.


          अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे जागतिक स्तरासह देशातील गुंतवणूकदार चिंतेत राहणार आहेत. तर या घटनेचे परिणाम विविध उद्योग क्षेत्रावर होणार असून याकरीता आगामी काळातील गुंतवणूक ही सावधगिरी राखण्याची गरज असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर 4.4 टक्क्यांनी वधारले असून दर प्रति बॅरेल 69.16 वर राहिले होते.
 

मागे

इराकच्या हवाई हल्ल्यात ६ जण ठार; युद्ध भडकणार?
इराकच्या हवाई हल्ल्यात ६ जण ठार; युद्ध भडकणार?

       इराकच्या बगदादमध्ये अमेरिकेने आज पुन्हा एक हवाई हल्ला चढविला आह....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या 'अदानी' व 'बेस्ट'ची वीज महागण्याची शक्यता
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या 'अदानी' व 'बेस्ट'ची वीज महागण्याची शक्यता

        मुंबई - पुढील पाच वर्षांत मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी व 'बे....

Read more