By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांना तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांचा खोळंबा झाला. चर्चगेटकडून येणार्या धीम्या गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
सकाळी गर्दीच्या वेळेस वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. दोन्ही स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याची दिसत होते. चर्चगेटहून अंधेरीला येणारी धीमी वाहतूक जवळपास २० मिनिटे उशिराने सुरू आहे.
स्टेशनदरम्यान, माहीम आणि माटुंगा रेल्वे रुळांना गेलेल्या तडा जाताच घटनास्थळी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तेथे दाखल झाले आहेत. रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. काल सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांना तडा गेल्याने मध्य रेल्वेची विस्कळीत झाली होती.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अमेरिकेतील शिकागो आणि इंग्लंडच्....
अधिक वाचा