By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 01:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सायन - पनवेल मार्गावर विचित्र अपघात खांदा कॉलनी उड्डाण पुलावर झाला. दिशादर्शक खांबाला डंपर अडकून अपघात झाला. त्यामुळे पुलावरील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर डंपर चक्क दोन चाकांवर उभा असल्याचे दिसून येत होते. दिशादर्शक खांबाला डंपल लटकल्याने अशी स्थिती झाली होती.
डंपरचे बकेट उघडे गेले आणि वरती दिशादर्शक खांबाला अडकले. त्यामुळे डंपर रस्त्यावर दोन चकांवर उभा होता. तर दोन चाके हवेत, अशी स्थिती झाली होती. दरम्यान, यात चालक डंपरमध्येच होता. तोही वरती अडकला होता.
घटनास्थळी अग्नीशमन दलाने जाऊन चालकाची सुटका केली. यामुळे काही काळासाठी येथे वाहतूक कोंडी झाली होती. सध्या डंपर बाजूला काढण्यात आला असून सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. आता वाहतूक पूर्वत झाली आहे.
गरजेच्यावेळी एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेकदा आपली गोची होते. पण जास्त काळ ....
अधिक वाचा