ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिक्षकांना पहिल्यांदाच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार वेतन

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिक्षकांना पहिल्यांदाच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार वेतन

शहर : मुंबई

आता सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पहिले वेतन शिक्षकांच्या खात्यात राज्य सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झालीय. तर, शिक्षकांना पहिल्यांदाच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे. एप्रिल महिन्यात ७ तारीख झाली तरी पगार रखडल्यामुळे शिक्षकांना ऐन गुढीपाडव्याच्या सणात आर्थिक चणचण सहन करावी लागली होती. मात्र, याबाबत शिक्षक संघटनांकडून दबाव आणल्यानंतर अखेर आयोगानुसार पगार जमा होण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झालीय. गेल्या ३० जानेवारी रोजी राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही शिक्षकांना त्यानुसार वेतन देण्याबाबत दिरंगाई सुरू होती. माञ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेतन आयोगासाठी सतत पाठपुरावा केला आहे. मंत्रालय, आयुक्त ते युनियन बँक अशी अव्याहत धावपळ केल्याने हा पाठपुरावा राजकारण न करता केल्याने शिक्षकांना वेतन मिळाले असल्याचे परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले आहे. तर मूळ सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंत्रालय स्तरावर तसेच संचमान्यतेत अतिरिक्त झालेल्या आणि ज्यांचे वेतन मूळ शाळेतून होतेय अशा शिक्षकांची वेतन निश्चिती कुणी करावी, असा प्रश्न निर्माण झाल्याने अतिरिक्त शिक्षकांना ७ वा वेतन आयोग उशिरा मिळणार होता याबाबतही भाजप प्रदेश शिक्षक आघाडीने प्रयत्न केल्याचेही अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे. तर, पगाराची बिलेसुद्धा १५ दिवस उशिराने ट्रेझरीकडे पाठवण्यात आली नव्हती. हस्तक्षेप केल्यानंतर शिक्षकांचे पगार ईसीएस झाल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

मागे

सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या
सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या

सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामती शहरातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन ....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम रेल्वे प्रशासने मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर देणार ५ टक्के बोनस
पश्चिम रेल्वे प्रशासने मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर देणार ५ टक्के बोनस

पश्चिम रेल्वे प्रशासने आता मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर ५ टक्के ब....

Read more