By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 07:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
बीड - राज्यात आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक लेकरांचा मृत्यू झाला आहे. त्यातच बीडमधील प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे. 20 वेळा प्रसुती झालेल्या बीडच्या लंकाबाईंची 21 व्या वेळी प्रसुती झाली. मात्र, बीडच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे लंकाबाई माजलगाव सोडून ऊस तोडणीसाठी थेट कर्नाटकात गेल्या. तेथेच त्यांची तीन दिवसांपूर्वी प्रसूती झाली. गर्भाशयाची योग्य काळजी न घेतल्याने नवजात स्त्री अर्भकाचा मृत्यू झाला.
लंकाबाई माजलगाव येथे भंगार वेचण्याचं काम करत होत्या. त्यांचा पती गाणं गाऊन कुटुंबाचं उदरनिर्वाह करत होते. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबद्दल भीती मनात बसल्याने लंकाबाई यांनी शस्त्रक्रिया करवून घेतलीच नाही. त्यामुळे त्यांची तब्बल 20 वेळा प्रसूती झाली.
दरम्यान, बीड आरोग्य विभागाने काळजी घेतली असती, तर लंकाबाईंच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला नसता असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केला आहे. त्यामुळे बीड आरोग्य खात्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. तिच्या कुटुंबाशी अजून कोणताही संपर्क झाला नाही.
जम्मू - जम्मू-काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरमध....
अधिक वाचा