By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2021 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिकमध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘कपडे काढो’ आंदोलन करुन खासगी हॉस्पिटलमधील मनमानी कारभार चव्हाट्यावर आणणारे आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यासह अमोल जाधव विरुध्द मुंबई नाका पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर भावे यांच्या समर्थनार्थ मुंबई पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणा-या १४ जणांसह अनोळखी व्यक्तींवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन व घोषणाबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणी वोक्हार्ट हॅास्पिटलला सुध्दा जाधव यांचे डिपॅाजीटचे पैसे परत करण्याबाबत समज दिली आहे.
कोरोनाच्या संकटात आर्थिक पिळवणूक होत असलेल्या सर्वसामान्यांसाठी ‘ऑपरेशन हॉस्पिटल’ हे अभियान राबवून आंदोलन करणा-या भावेची गेले दोन दिवस सोशल मीडियामधून चर्चा होत असतांना पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला. भावे यांच्या अदखपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांनी त्यांना हॅास्पिटलविरोधात बिलासंबधी कोणतीही तक्रार असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची समज दिली आहे.
यावेळी पोलीसांनी ज्यांना बिलासंबधी काही तक्रार असेल त्यांनी संबधीत शासकीय विभागाकडे कायदेशीर दाद मागावी, जो कोणी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. मुंबई नाका पोलिस स्थानकासमोर मंगळवारी भावे यांच्या समर्थनार्थ आलेल्या दिनानाथ चौधरी, शुभम खैरनार, अक्षरा घोडके, राम वाघ, सोमनाथ कुराडे प्रिया कोठावदे, शशिकांत शालीग्राम चौधरी, भाग्यश्री गहाळे, रविंद्र धनक, योगेश कापसे, संजय रॅाय, विनायक येवले, संदीप शिरसाठ, सागर कुलकर्णी, यांच्यासह २० ते २५ अनोळखी इसमावर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन व घोषणाबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारल....
अधिक वाचा