By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नवी दिल्लीत खाजगी सुरक्षा यंत्रणांना परवाना देण्याच्या पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किसन रेड्डी आणि गृह सचिव अजय कुमार भल्ला यावेळी उपस्थित होते.
देशात उद्योग धंद्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात खाजगी सुरक्षा यंत्रणांचा महत्वाचा वाटा आहे असे अमित शाह यावेळी म्हणाले की, सुरक्षित वातावरणात उद्योग क्षेत्राची भरभराट होत असते तसेच सुरक्षा यंत्रणांची भविष्यात अधिकाअधिक गरज भासणार असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खाजगी सुरक्षा यंत्रणांनी परवाने घेऊन आपली विश्वासाहर्ता वाढवावी असे आमित शाह म्हणाले.
या ऑनलाईन पोर्टलमुळे सुरक्षा यंत्रणांना परवाने देण्यात पारदर्शकता येईल. यंत्रणेने सर्व कागदपत्र व्यवस्थित भरल्यानंतर ऑनलाईन परवाना मिळू शकेल. हे पोर्टल येत्या तीन महिन्यात सर्व भारतीय भाषांमध्येही उपलब्ध असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
देशभरातली सर्व पोलीस स्थानकं आता ऑनलाईन जोडली गेली आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कागदपत्रांची वैधता आणि वैयक्तिक तपासणी अत्यंत सोपी झाली आहे असे ते म्हणाले. खाजगी सुरक्षा यंत्रणांनी सरकारसोबतच परवानाधारक यंत्रणांसाठी आग्रह धरावा असे आवाहन त्यांनी केले.
सुरक्षा यंत्रणांनी लष्करी किंवा निमलष्करी दलातून निवृत्त झालेले अधिकारी घेण्याचा प्रयत्न करावा तसेच सुरक्षा रक्षक पदासाठी एनसीसीमधल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान भारतीय पीनल कोड संबंधित माहिती प्रशिक्षणार्थ्यांना द्यावी. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी खाजगी सुरक्षा रक्षकांनीच पहिल्यांदा दहशतवाद्यांशी सामना केला. त्यांच्या तत्पर कृतीमुळेच मोठी हानी टळली असे अमित शाह यांनी सांगितले
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने सतत दांडी मारणार्या 12 वाहक चा....
अधिक वाचा