By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 03:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच न्यायालयात गेलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मेडिकल प्रवेशात मराठा समाजाला यंदा आरक्षण मिळणार नाही.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू न करण्याच्या निर्णयाने मराठा समाजात नाराजीचं वातावरणं आहे.
नारायण राणेंच्या पुस्तकाने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. नारायण राणे यांन....
अधिक वाचा